फडणवीस, … माशा मारण्याचा आनंद घ्या – नबाब मलिकांचा टोमणा

Nawab Malik & Devendra Fadnavis

मुंबई : देवेंद्र फडणवीस(Devendra Fdanavis), तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपाने माशा मारणे स्पर्धाही भरवावी! असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक(Nawab Malik ) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मारला.

फडणवीसांची टीका

मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघात केला होता. मराठा आरक्षणावरून राज्य सरकार केद्राकडे बोट दाखवते आहे. केंद्रानेच सगळ करायचे आणि आम्ही मात्र राज्यात माशा मारत बसणार व दिलेले आरक्षण गमावून बसणार हे आणखी किती दिवस चालणार असा टोमणा फडणवीसांनी राज्य सरकारला मारला होता, त्यावर नवाब मलिकांनी प्रत्युत्तर दिले.

फडणवीस म्हणाले होते की, यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती. परंतु, महाविकास आघाडी सरकार टाइमपास करत आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button