फडणवीस, दरेकर रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यात ; काँग्रेस नेता म्हणाले …

Darekar-Fadnavis-Sachin Sawant

मुंबई :- रेमडेसिवीर इंजेक्शनची नियमबाह्य निर्यात करत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ब्रुक फार्माच्या मालकांना सोडवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी शनिवारी रात्री थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. भाजप नेत्यांच्या या वर्तनावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

एका व्यावसायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव आणणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांना पाहून आश्चर्य वाटते. पोलिसांचा दोष काय? रेमडेसीवीरच्या ६०,००० इंजेक्शनचा मोठा साठा ब्रुक्स लॅबोरेटरीजच्या निर्यातदारांकडे लपवला आहे. त्याबाबतची माहिती दडवण्यात आली आहे, असे पोलिसांना कळले होते. निर्यात बंदी झाल्यावर कंपनीने CDSCO ला आणि राज्य FDA ला साठ्याची माहिती देणं आवश्यक होतं. त्याच अनुषंगाने मुंबई पोलिसांनी कंपनीच्या संचालकाला चौकशीसाठी बोलावलं, पण त्यानं उडवाउडवी केली. दोन दिवसांनी तो आला. परंतु त्याच्या मदतीला स्वतः फडणवीस रात्रीच्या वेळी धावले. भाजपचे नेते बिथरल्याचे हे लक्षण आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे.

‘कोरोना महामारीमध्ये रेमडेसिवीरची प्रचंड कमतरता असताना पोलिसांकडून काय अपेक्षा असेल? चौकशीसाठी ते कोणाला बोलावू शकत नाहीत का? भाजप नेते जनसामान्यांसाठी अशी पावले उचलतात का? असा सवाल सावंत यांनी केला आहे.

आपले कर्तव्य तत्परतेने बजावणारे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे आणि टीमचे त्यांनी जाहीर अभिनंदनही केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button