संकटाची जबाबदारी केंद्रावर टाकण्याचे ठाकरे सरकारचे धोरण अयोग्य – फडणवीस यांची टीका

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

बारामती : कोणतंही संकट आले की त्याची जबाबदारी केंद्र सरकारवर टाकायची आणि नामानिराळ व्हायच हे ठाकरे सरकारचं धोरण अयोग्य आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी फडणवीस बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार हे मराठवाडा तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सोलापूर दौऱ्यावर आहेत.

फडणवीस म्हणाले – पंचनामे वगैरेच्या भानगडीत न पडता सरकारने मदत जाहीर केली पाहिजे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. केंद्र सरकार मदत देईलच पण राज्य सरकार काही मदत करणार आहे की नाही? जबाबदारी झटकून कसे चालेल? पूरस्थितीमध्ये मदत देण्याची पहिली जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. राज्याने तातडीची मदत केलीच पाहिजे. पुराचे संकट राज्यावर आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करुन ‘आम्ही सर्वतोपरी मदत करु’ असे आश्वासन दिले. मोदी सरकार मदत करेलच पण राज्य सरकार काही मदत करणार आहे की नाही? दरवेळी संकट आलं की जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलायची आणि आपण नामानिराळ रहायच हे ठाकरे सरकारचे धोरण योग्य नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER