…हा तर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ला मान्यता देण्याचा प्रयत्न – फडणवीस

मुंबई :- देशविरोधी आणि समाजविरोधी कारवाया केल्याचा आरोप असणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेबाबत मुंबई महापालिकेच्या एका पत्रकावरून पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केले आहे. कोरोनामुळे मुस्लिम समाजाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती अंत्यविधीबाबत निर्णय घेण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला देण्यात यावी. अंत्यविधीबाबत ते निर्णय घेतील, असे एक पत्र बृहन्मुंबई महापालिकेतील आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी पद्मजा केसकर यांनी दिले होते. यावरूनच फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरच्या माध्यमातून लक्ष केले आहे.

ही बातमी पण वाचा : विद्यार्थ्यांना “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना? आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल 

मला आश्चर्य वाटले, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) सारख्या संघटनेला मुंबई महापालिकेने कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न केला आहे. ही संघटना देशविरोधी आणि समाजविरोधी कार्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे आपल्याला मान्य आहे का? जर आपल्याला हे मान्य नसेल तर कठोर कारवाई करणार का? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER