लाव रे तो व्हिडिओ! फडणवीसांनीही वापरले राज ठाकरेंचे अस्त्र

Devendra Fadnavis-Raj Thackeray.jpg

उस्मानाबाद : कोरोनाच्या संकटातून (Corona crises) देश जात असतानाच राज्यातील शेतक-यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील नेते शेतक-यांच्या बांधावर निघाले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज उस्मानाबदमध्ये गेले आहेत. पत्रकार परिषदेत आज फडणवीस यांनी लाव रे तो व्हीडीओ म्हणत राज ठाकरेंचे (Raj Thackeray) अस्त्र वापरल्याचे दिसले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी फडणवीस उस्मानाबादमध्ये पोहोचले आहे. फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. याच मुद्यावरून सरकारला घेरण्याची फडणवीस यांनी रणनीती आखली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लाव रे तो व्हिडीओ म्हणत एकच गोंधळ उडवून दिला होता. आता देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरेंचे हेच अस्त्र वापरले आहे आणि सरकारविरोधात ‘लाव रे तो व्हिडिओचा प्रयोग केला आहे.

सत्तेत येण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी कोरडवाहु शेतीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये आणि बागायतीसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. या दोन्ही नेत्यांचे जुने व्हिडिओ काढून राज्य सरकारला शेतकऱ्यांना त्यांची मदत करण्याची नेमकी काय भूमिका होती याची आठवण फडणवीस यांनी करून दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER