पवारांनी कृषी कायद्यांच्या मूळ तत्वांना विरोध केलेला नाही, फडणवीसांचा दावा

Sharad Pawar & Devendra Fadnavis

रायगड :- कृषी कायद्याविरोधात सध्या राजकीय वातावरण चांगलाच तापत चालला आहे. उद्या शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून, त्याला विरोधी पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांनी कृषी कायदे समजून घेण्याची गरज असल्याचा टोला लगावला आहे. पंजाब आणि हरियाणा शिवाय इतरत्र कुठेही आंदोलन झाले नाही. महाराष्ट्रातील काँग्रेस (Congress) नेत्यांनी ट्रॅक्टर चालवण्याशिवाय काहीही केलेलं नाही. राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. काही जण समजून घेऊनही झोपल्याचं सोंग करुन शेतकऱ्यांच्या फायद्याच्या कायद्यांना विरोध करत आहेत, असंही फडणवीस म्हणाले.

कृषी कायद्यात ज्या बाबाी आहेत त्यावर महाराष्ट्रात अगोदरच कायदे झाले आहेत. कृषी कायद्यांच्या अध्यादेशांच्या अंमलबजावणीचे आदेश काढणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. कृषी कायदा हा शेतक-यांच्या फायद्याचे आहेत.ज्यांचे हितसंबंध अडचणीत ते शेतक-यांना दिशाभूल करताहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर कृषी कायद्यांचं समर्थन करावं की विरोध करावा, असा यक्षप्रश्न आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या आधारे हे कायदे तयार करण्यात आले आहेत. त्यांनी कृषी कायद्यांच्या मूळ तत्वांना विरोध केलेला नाही. ते कधी त्याच्यावर बोलत नाहीत. मात्र, वाहत्या गंगेत अनेक जण हात धुत आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी राज्याच्या राजकीय स्थितीवरही भाष्य केलं. आगामी निवडणुकांसाठी आम्ही सावध पवित्रा घेणार आहोत. तीन पक्षांची आघाडी असल्यानं त्यांच्या ताकदीचं आकलन करण्यास कमी पडलो. विधानपरिषद निवडणुकीत आम्हाला अतिआत्मविश्वास होता. मात्र, आगामी काळात भविष्यात पूर्ण स्पेस मिळेल. आमचे छोटे मित्रपक्ष आमच्या सोबत असतील, असंही ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रातील आम्ही सरकार पाडणार नाही, सरकार पडलं तर पर्यायी आणि सक्षम सरकार देऊ, सरकार पाडण्याची आमची कुठलीही रणनीती नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : फडणवीसांची राज ठाकरेंना साद, म्हणाले ‘मराठी माणसाबद्दलची त्यांची भूमिका आम्हाला मान्य’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER