भरपावसात फडणवीसांची प्रचारसभा, म्हणाले…महावसुली सरकारला घालवण्याची हीच संधी

Fadnavis Pandharpur by-election

पंढरपूर :- राज्यात सरकार स्थापन झाले तेव्हा या सरकारने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असे नाव दिले होते. मात्र आता हे सरकार महावसुली सरकार झाले आहे. पोलिसांच्या भरवशावर खंडणी वसूल करणारे हे सरकार असल्याचे उघड झाले आहे. लोकशाहीमध्ये सरकारचा अनाचार, भ्रष्टाचार दाखवून द्यायचा असेल तर या जुलमी सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा हक्क तुम्हाला प्राप्त झाला आहे, या महावसुली सरकारला घालवण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे. त्या संधीला दवडू नका, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पंढरपुरात केले. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी फडणवीसांनी पंढरपुरात प्रचारसभा घेतली. विशेष म्हणजे शरद पवारांसारखेच देवेंद्र फडणवीसही पावसात बोलत असल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या.

इतर देशांनी कोरोनाच्या (Corona) काळात छोट्या छोट्या व्यावसायिकांना भरपूर मदत केली, परंतु आपल्या सरकारने वीजबिलांच्या माध्यमातून जुलमी वसुली केली, ही निवडणूक एका मतदारसंघाची असली तरी महाराष्ट्रासाठी ही निवडणूक नवीन विचार आणि आचार घेऊन येणारी असेल. हे सरकार लोकशाहीचे नसुन लॉकशाहीचे आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत. या महाराष्ट्रात कारखाने खड्ड्यात घालायचे आणि विकत घ्यायचे काम कोण करतंय, असं म्हणत त्यांनी नाव न घेता शरद पवारांवरही निशाणा साधलाय. या सरकारचे १०० अपराध भरलेत, या निवडणुकीमध्ये तुम्ही यांचा कार्यक्रम करा मी राज्यामध्ये यांचा कार्यक्रम करतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत. आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घेण्याची गरज लागत नाही.

‘लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो. पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे. या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडीला २ मे रोजी धक्का बसणार : देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button