फडणवीस यांनी गृहमंत्र्यांविरोधात आणला हक्कभंग!

Devendra fadnavis & Anil Deshmukh

मुंबई :- अर्थसंकल्पीय अधिवेशनात अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणावरून गृहमंत्री अनिल देशमुख आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. फडणवीस यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात हक्कभंग सूचना मांडली.

“अन्वय नाईक यांच्या खटल्यामध्ये मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी दाबले, असे वक्तव्य देशमुख यांनी केले आणि त्याची दुरुस्ती केली. त्यांची आत्महत्या झाली आहे. असे स्टेटमेंट त्यांच्या पत्नी आणि मुलीने दिले. तसेच सुप्रीम कोर्टाने याबद्दलचे स्पष्ट अभिप्राय नोंदविले आहेत. हे प्रकरण दाबले असे म्हणणे म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अनादर आहे. माझा आणि सुप्रीम कोर्टाचा देशमुख यांनी अनादर केला.” असा आरोप फडणवीसांनी केला.

त्याचबरोबर, सुप्रीम कोर्टाचा निकाल गृहमंत्र्यांना माहीत असून त्यांनी सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. सरकारला जाब विचारण्याचा अधिकार आहे. त्यातून माझा हक्क दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विशेष हक्कभंग समितीकडे हे प्रकरणे देण्यात यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाण यांचे विधान असत्य आणि दिशाभूल करणारी आहे. मी त्यांच्याविरोधात विशेषाधिकाराची हक्कभंगाची सूचना मांडतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनसुख हिरेनप्रकरणावर मंगळवारी भाजप आमदारांनी अधिवेशनात राडा घातला. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावर निवेदन केले पाहिजे. अध्यक्ष महोदय, तुमच्यासमोर वझे यांना निलंबित करण्याचे ठरले होते, आता कोणावर दबाव आहे? जर वझे यांना निलंबित करण्याचा निर्णय झाला, तर जाहीर का करत नाही.” असे फडणवीस म्हणाले.

“अन्वय नाईक प्रकरणाची आम्हाला चौकशी करायची आहे, हे प्रकरण दाबले गेले आहे.” असे अनिल देशमुख म्हणाले होते. त्यानंतर “अन्वय नाईकप्रकरणाची काय चौकशी करायची आहे ती खुशाल करा.” असे आव्हान फडणवीसांनी दिले.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गृहमंत्र्यांनी वझेंबद्दलचा निर्णय बदलला, फडणवीस यांचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER