माझं आणि फडणवीस यांचं या गोष्टीवर एकमत आहे- राज ठाकरे

Devendra Fadnavis and Raj Thackeray

मुंबई : राज्य सरकारने अजूनही जिमचालकांना जिम सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर आज जिमचालक आणि मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली .

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशीही माझं बोलणं झालं. त्यांचंही म्हणणं आहे की, जिम सुरू झाले पाहिजे. आता मी सांगतोय जिम सुरू करा, ज्याला यायचे आहे, तो जिमला येईल. बघू काय होते, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे जिममालक यांच्या भेटीनंतर म्हणाले .

जिम (Gym) व्यवसायाशी संबंधित असलेल्या अनेकांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. यावरून तुम्ही जिम सुरू करा, किती दिवस लॉकडाऊनमध्ये (Lockdown) काढणार आहात? असा सवाल करत राज ठाकरे यांनी जिमचालकांना केंद्राच्या नियमावलीनुसार नियम पाळून जिम सुरू करण्याचे आवाहन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER