फडणवीस – अजित पवार आणि राजकीय भूकंपाची पुन्हा चर्चा

Fadnavis - Ajit Pawar

पुणे : शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीरपणे पार्थला अपरिपक्व म्हणून, त्याच्या बोलण्याला किंमत देत नाही, असे फटकारल्यापासून पवार कुटुंबात वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज बारामतीत पार्थचे काका श्रीनिवास यांच्या घरी अजित पवार (Ajit Pawar), त्यांची बहीण व इतर नातेवाईक जमणार आहेत. त्याच वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) पुण्यात आहेत.

ही बातमी पण वाचा:- राष्ट्रवादीत दोन गट; बहुसंख्य नेते शरद पवारांसोबत

यामुळे फडणवीस – अजित पवार आणि राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस एका कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी १५ ऑगस्टला पुण्यात आहेत. नेमके त्याच वेळी राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या कंटुंबात पार्थबद्दल एकत्रित चर्चा होत असताना देवेंद्र फडणवीसही तिथेच असल्याने फडणवीस-पवार यांच्यातील राजकीय समीकरणाविषयी पुन्हा चर्चा व्हायला लागल्या आहेत.

पार्थला शरद पवार यांनी अपरिपक्व म्हटल्याबद्दल फडणवीस यांनी, हा त्यांच्या परिवारातला विषय आहे, असे म्हणून त्यावर बोलणे टाळले होते. गेल्या वर्षी २३ नोव्हेंबरला सगळ्यांना मोठा राजकीय धक्का देत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला होता. एकमेकांवर प्रखर टीका करणारे हे दोन नेते कोणाच्याही नकळत राजकीय मित्र झाल्याचे सगळ्यांनी पाहिले होते. आता पुन्हा एकदा ती मैत्री फुलून राज्यात राजकीय भूकंप होणार का, अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER