मी अहवाल लिहू शकतो हे फडणवीसांनी मान्य केले तेच माझ्यासाठी भरपूर – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad - Devendra Fadnavis - Maharashtra Today

मुंबई :- रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी केलेल्या फोन टॅपिंग आणि त्यामध्ये आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या नावांसंदर्भात मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालावर विरोधकांनी आक्षेप घेत चुकीचा असल्याचे म्हटले आहे. हा अहवाल सीताराम कुंटेंनी तयार केलाच नसेल, तो जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) किंवा नवाब मलिक (Nawab Malik) यांनी तयार केला असावा, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. यानंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. मी अहवाल लिहू शकतो हे फडणवीसांनी मान्य करणे हे माझ्यासाठी भरपूर आहे. तसेच, अशी शंका घेणं हा सीताराम कुंटेंचा अपमान असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.

मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीनं सुरु होता. भाजप नेते नुसता थयथयाट करत आहेत. माझ्यावर अहवाल लिहिल्याचा आरोप कशाला करता. कुंटे तुमच्याही जवळ होते. कुंटेंनी रश्मी शुक्लांविरोधात अहवाल दिला त्यामुळं वाईट वाटतेय का? अहवाल तुम्हीच फोडला आणि आमच्यावर आरोप करता. संभ्रम निर्माण का करता, असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

विरोधकांनी विचारलं पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये रुमालचा उल्लेख का नाही? पोस्टमॉर्टममध्ये बॉडीचं डिसेक्शन होतं. रुमालचं डिसेक्शन होत नाही. रुमाल जप्त होतो. त्यानंतर फॉरेन्सिक डिपार्टमेंटला तपासणीसाठी पाठवण्यात आला, असं आव्हाड म्हणाले.

मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास अतिशय योग्य गतीने चालू होता. उगाच भूई थोपटीत बसायची आणि संभ्राम निर्माण करायचा, हाच त्यांचा प्रयत्न आहे. याशिवाय काहीही होत नाही. माझ्यावर अहवाल लिहिण्याचा आरोप करण्यात आला. म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवण्याचं काम आहे. सीताराम कुंटे हे कधीकाळी तुमच्याही जवळचे होते. सरकारी अधिकाऱ्यांनी राज्य सरकारसाठी काम केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात अहवाल लिहिल्यामुळे नाराज झालात का? तपास योग्यरितीने सुरु होता. महाराष्ट्र सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी फोन केलेला नाही. उगाच मंत्र्याची बदनामी करायची कामे सुरु आहेत, असा घणाघात आव्हाड यांनी केला.

ही बातमी पण वाचा : रिपोर्ट तर आव्हाड आणि मालिकांनी तयार केला, सही फक्त कुंटेंची, फडणवीसांची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER