अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस आक्रमक; सभागृहात भाजपा आमदारांची घोषणाबाजी

Devendra Fadnavis

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. राज्याची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प, शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करु सांगितलं, अनेक अटी टाकल्या, शेतकऱ्यांबाबत सरकारची फसवणुकीची मालिका कायम, आम्ही निषेध करतो, महिलांवरील अत्याचारही वाढले आहेत. असे म्हणत त्यांनी सभागृहात सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

मुंख्यमंत्र्यांनी सीएएला काँग्रेसचा विरोध आहे हे आधी समजून घ्यावे – पृथ्वीराज चव्हाण

अधिवेशनाचं कामकाज सुरु होण्यापूर्वी विरोधी पक्षातील आमदारांनी सभागृहाच्या पायऱ्यांवरती बसून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, असे म्हणत भाजपा आमदारांनी घोषणाबाजी केली. त्यांनतर सभागृहाचे कामकाज सुरु होताच फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीमध्ये स्पष्टता नाही, किती शेतकऱ्यांना मिळणार माहित नाही, महिलांवरील अत्याचार वाढलेत, त्या सर्वांवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे अधिवेशनाची सुरुवात गोंधळापासून झाली.