मोहिते पाटलांच्या कट्टर विरोधकाची मुख्यमंत्री घेणार भेट

CM Fadnavis

मुख्यमंत्री फडणवीस हे विजयसिंह मोहितेंच्या कट्टर विरोधकाच्या घरी विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याबाबत विशेष चर्चा सोलापुरात रंगली आहे. मोहिते पाटील यांना मुख्यमंत्री फडणवीस डावलत तर नाहीय, अशी कुजबूज सोलापूरच्या राजकीय वर्तुळात आहे.


सोलापूर : आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री फडणवीस पंढरपूरला जाणार आहेत. यावेळी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून ते सोलापूर जिल्ह्यातील भाजप नेते राजकुमार पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत .

ही बातमी पण वाचा : फोडाफोडीत आता महाराष्ट्राचा नंबर

आषाढी पूजेनिमित्त मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार हे कळताच भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी लगबग सुरू झाली आहे. या दरम्यान ते कोणाकोणाला भेटणार, काय बोलणी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक राहिलेले राजकुमार पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला मुख्यमंत्री फडणवीस जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या लग्नसोहळ्या दरम्यान या दोन नेत्यांमध्ये काय गुप्तगू होणार याविषयी राजकीय गोटात चर्चा सुरू झाली आहे.

ही बातमी पण वाचा : आघाडीवर नाराज असलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात : राधाकृष्ण विखे पाटील

मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दिग्गज नेते आणि शरद पवारांचे सख्खे निकटवर्ती होते; परंतु त्यांचा मुलगा रणजितसिंह पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपत प्रवेश केला. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपसोबत सलगी वाढवली. एवढेच नव्हे तर माढा लोकसभा मतदारसंघात त्यांनी उघडपणे भाजपचे काम केले; शिवाय राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मोहिते पाटील यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री आणि आमचं आधीच ठरलं आहे, असं म्हणून मोहिते पाटील यांनी विषयाला भाजप मंत्रिपदाच्या विषयाला बगल दिली. त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस हे विजयसिंह मोहितेंच्या कट्टर विरोधकाच्या घरी विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याबाबत विशेष चर्चा सोलापुरात रंगली आहे. मोहिते पाटील यांना मुख्यमंत्री फडणवीस डावलत तर नाहीय, अशी कुजबूज सोलापूरच्या राजकीय वर्तुळात आहे.

विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी सोडली नसली तरीही या निवडणुकीत त्यांनी थेट भाजपला मदत करणारी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होणार – नीलम गोऱ्हे