फक्त खुर्ची टिकवण्यासाठी! 26 हजार कोटींच्या घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट :देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis and Ajit Pawar.jpg

मुंबई :- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सुमारे 26 हजार कोटींच्या घोटाळा प्रकर णात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना क्लीन चिट देण्यात आली आहे . यावरून विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र प्रदेश भाजपची कार्यकारिणीची बैठक गुरूवारी पार पडली. या बैठकीत राज्याचे फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर कोरोना महामारी, महिलांवरील अत्याचार, मराठा आरक्षण, कृषी- कामगार कायदा, अशा विविध मुद्द्यांवरुन चौफेर टीका केली.

26 हजार कोटींचा घोटाळा झाला असताना क्लीन चिट कसे काय देताय? असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फक्त खुर्ची टिकवण्यासाठी हे चालू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. सत्ता वाचवताना काय चाललंय याच्याकडे लक्ष आहे का? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला .

दरम्यान महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँकेच्या 26 हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अजित पवार यांच्यासह 76 जणांना क्लीनचीट दिली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER