मुंबईतील शेतकऱ्यांच्या मोर्चाला कुणाचाही पाठिंबा नाही, मग ही ढोंगबाजी का? : फडणवीस

नागपूर : महाराष्ट्रात कृषी विधेयक (Agriculture Bill in Maharashtra) येऊन एवढे दिवस झाले तरी आंदोलन करण्यात आले नाही, काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत आहेत. शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, शेतकऱ्यांना मुद्दामपणे चुकीची माहिती देण्यात येत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी रविवारी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत. या शेतकऱ्यांना भडकविण्याचं काम काही पक्ष करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा (Farmer-protest) रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सहभागी होणार आहे.

तिन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीवरुन फडणवीसांनी टीका केली. जे लोकं या मोर्चाच्या निमित्ताने मंचावर जात आहेत त्यांना माझा प्रश्न आहे काँग्रेस पक्षाने आपल्या 2019 च्या जाहीरनाम्यात बाजारसमित्या रद्द करु असं म्हटलं होतं. मग आता काय झालं, आम्ही तर बाजार समित्या रद्द करु असं सांगितले नाही. मग शेतकऱ्यांना भडकवून हे नेते काय साध्य करु पाहत आहेत. काँग्रेसने 2006 साली कंत्राटी शेतीचा कायदा त्यांनी का मंजूर केला याचं उत्तर दिलं पाहिजे. 2020 पर्यंत तो कायदा सुरू आहे. यांना महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा चालतो मग केंद्राचा का नाही, ही ढोंगबाजी का? शेतकऱ्यांचा या मोर्चाला कुणाचाही पाठिंबा नाही. उलट शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने तर या कृषी कायद्यांचे स्वागत केले आहे, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER