तीन दिवस अजितदादांनी काकांना सोडले होते, हा इतिहास नाही का? – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

सांगली : सध्या अजित पवार (Ajit Pawar) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल कुठल्याही टीकेला सडेतोड उत्तर देत आहे. मात्र, गेल्यावर्षी तीन दिवसांसाठी का होईना, त्यांनी काकांना सोडले होते, हा इतिहास विसरुन कसा चालेल, असा खोचक टोला भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांना लगावला.

राज्यात गेल्यावर्षी अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयोगाला आज एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर सोमवारी महाविकासघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनी या आठवणींना उजाळा देत एकप्रकारे भाजप नेत्यांच्या जखमेवर मीठ चोळले.

या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात प्रत्युत्तर दिले. आता कितीही गोडवे गायले तरी गेल्यावर्षी तीन दिवसांसाठी अजितदादांनी काकांना सोडले होते, हा इतिहास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही दरबारी लोकांची पार्टी आहे. भाजप हा सामान्य माणसाचा पक्ष आहे. गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीवेळी मी कोथरूडला अडकलो होतो. त्यामुळे इस्लामपुरात पुरेसे लक्ष देता आले नाही. आमच्यात मतभेद नसते तर इस्लामपूरात जयंत पाटील यांची सुट्टी केली असती. मग ते राज्याचे नव्हे तर तालुक्याचे नेते राहिले असते. आता आगामी निवडणुकीत पाहूच, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांबाबातच्या त्या विधानाने वादळ; राष्ट्रवादीनेही पाटलांना फटकारले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER