फेसबुक अकाउंट ब्लॉक ! हा लोकशाहीवर आघात – मीरा कुमार

Meira Kumar

दिल्ली : माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार (Meira Kumar) यांचे फेसबुक (Facebook) अकाउंट ‘ब्लॉक’ झाले आहे. “फेसबुक पेज ब्लॉक केले गेले! असे का? लोकशाहीवर आघात! हा केवळ योगायोग असू शकत नाही की, बिहार विधानसभा निवडणुकीच्या अगोदर फेसबुककडून माझे पेज ब्लॉक केल्या जाते.” अशा शब्दांमध्ये मीरा कुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियामधील एक माध्यम असलेल्या फेसबुकवर एकपक्षीय असण्याचे आरोप देशात अनेकवेळा झाले आहेत. याबाबत काँग्रेस प्रवक्ता रणदीपसिंह सुरजेवाला यांनी एक ट्विट केले – आम्ही पाहिले आहे की, फेसबुक इंडियाच्या नेतृत्वाने मोदी सरकारच्या धोरणानुसार कशी तडजोड केली होती.

आता माजी लोकसभा अध्यक्ष व काँग्रेसच्या (Congress) एका वरिष्ठ नेत्याचे अकाउंट ब्लॉक केल्याने सिद्ध होते की, विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्यासाठी घाणेरड्या डावपेचांचा वापर केला जात आहे. मीरा कुमार यांनी ट्विटवर फेसबुक पेजचा स्क्रीन शॉट शेअर केला, ज्यावर फेसबुकडून लिहिले गेले आहे की, तुमचे पेज अनपब्लिश आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER