डोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची !

कोविड मुळे अनेक उपद्रवात्मक आजार डोके वर काढत आहेत. म्यूकरमायकोसिस, काळ्या बुरशीचा आजार अशा भयंकर समस्या उद्भवत आहेत. या उर्ध्व जत्रूगत अवयवांची काळजी खूप महत्त्वाची ठरते आहे. बुरशी कुठे वाढते तर जिथे ओलावा असतो किंवा खूप कोरडा भाग असेल. त्यामुळे या अवयवांची काळजी घेण्याकरीता काही आयुर्वेद (Ayurveda) विधिंचे दिनचर्येत पालन करणे खूप आवश्यक आहे.

नस्य – नाकात तेल सोडणे. नस्य चिकित्सा उर्ध्व जत्रुगत भागात असण्याऱ्या अवयवांना होणाऱ्या विकारांमधे श्रेष्ठ चिकित्सा आहे. नाकाच्या अंतः त्वचेला संरक्षण देण्याचे कार्य देखील हे नस्य करते. त्यामुळे नाक कान घसा मस्तिष्क यांचे संरक्षणार्थ नस्य चिकित्सा उपयोगी ठरते. अणुतेल याकरीता उत्तम आहे.

गण्डूष / कवल – आयुर्वेद संहितेत नित्य कवल गण्डूष विधी सांगितला आहे. यामुळे मुख दंत कण्ठ रोगांपासून संरक्षण होते. याकरीता त्रिफळा, सिद्धतेल इ. वापरून स्थानिक संक्रमण कमी होऊ शकते.
कर्णपूरण – कानात तेल सोडणे. कानाचे विकार होऊ नये, कानात मळ साचू नये तसेच श्रवण चांगले राहावे याकरीता कर्णपूरण नित्य दिनचर्येचा विधी आहे.

दंतधावन – ही रोजची क्रिया आहे. परंतु दात स्वच्छ करण्याकरीता आयुर्वेदात मधुर रस त्याज्य मानला आहे. मधुर रस कृमींना, त्वक विकार वाढविणारा आहे याउलट कडू रस कृमी नष्ट करणारा त्वक विकार दूर करणारा व्रण ठिक करणारा इन्फेक्शन दूर करणारा आहे. म्हणूनच करंज नीम अशा वृक्षांच्या काड्यांचा अथवा चूर्णांचा वापर करणे जास्त उपयुक्त आहे.

आयुर्वेदाच्या या नित्य विधींचा अवलंब करणे अनेक संक्रमणापासून रक्षण करणारे आहे. बुरशी तयार होऊ नये त्याकरीता या गोष्टी लाभदायक ठरतात. याशिवाय आहारात बदल, मधुमेहींना विशेष आहारविहार पाळणे आवश्यक आहे.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button