दिशा सॅलियन मृत्यूबाबत मोठा खुलासा; पार्टीत झाला होता सामूहिक बलात्कार

Disha Salian

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) एक्स मॅनेजर दिशा सॅलियनच्या (Disha Salian) मृत्यूबाबत एक मोठा खुलासा पुढे आला आहे. त्या दिवशीच्या पार्टीतील एका प्रत्यक्षदर्शीने हा खुलासा केला आहे. पार्टीत दिशावर सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. त्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधला एक स्टारसुद्धा उपस्थित होता, असेही त्याने सांगितले.

त्याने सांगितले की, पार्टीमध्ये एकूण सहा जण उपस्थित होते. दिशाचा होणारा पती रोहन रॉयसुद्धा उपस्थित होता. चार जणांनी मिळून दिशावर बलात्कार केला. दिशाचा आवाज बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून मोठ्या आवाजात गाणी लावली होती.

त्याने न्यूज नेशन वृत्तवाहिनीकडे हा खुलासा केला. दिशाचा ८ जून रोजी मुंबईतील एका इमारतीतील चौदाव्या मजल्यावरून पडल्यामुळे मृत्यू झाला.

सुशांत सिंहच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे गेल्यानंतर दिशाच्या मृत्यूबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचे कनेक्शन असल्याचेही सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER