स्क्रिन टाईम वाढल्याने डोळेदूखी

EYE Pain

पुणे : काेरोनामुळे (Corona) गेल्या सहा महिन्यात जीवशैलीच बदलली आहे. शाळा बंद असल्याने ऑनलॉईन अभ्यासाचा पर्याय पुढे आला. वर्कफ्रॉम होम संकल्पना झाली. ऑनलाईन उपक्रमांची रेलचेल वाढली. परिणामी स्मार्ट फोन, टॅब्लेट, आयपॅड, काॅम्पुटर, लॅपटॉप आदींचा वापरही वाढला. स्क्रीन टाईम वाढल्याने डोळ्यांच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. याजोडीला इतर छुपे आजारही सतावू लागले आहेत.

ऑनलाईन अभ्यासामुळे लहान मुलांपासून महाविद्यालयिन तरुणांपर्यंत तासंतास मोबाईलसह संगणकावर बसण्याचे प्रमाण वाढले आहे. डोळ्यांना नैसर्गिकरित्या पापण्यांव्दारे संरक्षण देण्यात आले आहे. डोळ्यांच्या आतील भागात ओलावा कायम ठेवण्याचे कामही पापण्या करत असतात. गेल्या सहा महिन्या स्क्रीन टाईम वाढला आहे. सतत स्क्रीनकडे पहात बसल्याने पापण्यांची उघडझाप मंदावते परिणामी डोळ्यांची नैसर्गिक काम करण्याची क्षमता कमी होते.

मोबाईलसह इतर स्क्रीनच्या वापरामुळे डोळ्यावर अतिरिक्त ताण पडतो. स्क्रीनचा ब्राईटनेसही आवश्यक तेवढा नसतो. अतिरिक्त किंवा कमी ब्राईटनेसमुळेही डोळ्यांवर परिणाम होतो. सतत स्क्रीनवर काम केल्याने डोळ्यांना थकवा जानवतो. अशा वेळी दर पंधरा मिनिटांनी काही वेळ विश्रांती घ्यावी. डोळे सतत उघडझाप करावी. थकवा आल्यास स्क्रीनकडे न पाहता दूरवरच्या एखाद्या वस्तूकडे पहावे. डोळ्यांचे व्यायाम करावेत. जेणेकरुन डोळ्यांना विश्रांती मिळेल, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.

*झोपेवर परिणाम*

वाढलेल्या स्क्रीन टाईमुळे झोपेवर परिणाम होतो. स्क्रीनच्या प्रकाशामुळे तसेच किरणामुळे केवळ डोळ्यांवरच पणिाम होत नाही. तर झोप न लागणे तसेच कमी झोप झाल्याने इतर व्याधी बळावतात. रात्रीची झोप कमी झाल्याने त्याचा जीवनचक्रावर परिणाम होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER