जहाल नक्षलवादी गुडु राम कुडयामी याला अटक, गडचिरोली पोलिसांची कारवाई

Guddu Ram Kudiyami

गडचिरोली : जहाल नक्षलवादी गुडु राम कुडयामी (Guddu Ram Kudiyami) याला अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे. आज पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथक प्राणहिताचे जवान नक्षलचिरोधी अभियान राबवित असतांना सी-६० पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे सदर नक्षलवाद्याला अटक करण्यात यश आले.

जहाल नक्षली गुड़ राम कुडयामी हा सन- २०१७ मुक्कावेली आरपीसी मिलीशिया प्लॉटुनमध्ये भरती झाला असुन, तो भरमार हत्यार सोबत बाळगत होता. त्याने सन- २०१७ मध्ये १५ दिवसाचे गरतुल येथे नक्षली प्रशिक्षण घेतले होते. उपपोस्टे जिमलगट्टा हद्दीतील मौजा किष्टापूर नाल्यावर सन २०२० साली करण्यात आलेल्या वाहन जाळपोळीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असून, याबाबत उपपोस्टे जिमलगट्टा येथे गुन्हा दाखल असुन, त्यामध्ये तो फरार होता. तसेच छत्तिसगड मधील मौजा सागमेटा येथील विज्या कुडयामी, मौजा दामाराम या गावातील गुज्या यहे मौजा मंडेम गावातील बुधू तसेच मौजा लंकापार व येडसगुंजी येथील सहा. आरक्षक रमेश याचे खुनामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्याचबरोबर मौजा परसेगड येथे झालेल्या पोलीस- नक्षल चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असून, सदर नक्षलवाद्यांवर मौजा परसेगड पोलीस स्टेशन जि. बिजापूर येथे गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यामध्ये तो फरार होता. या व्यतिरिक्त आणखी किती गंभीर गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे, याचा तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER