अतिवृष्टी, पुराने नुकसान : मदतीच्या दुसऱ्या हप्त्यात २,१९२ कोटी वितरित

vijay wadettiwar

मुंबई :  जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत विविध जिल्ह्यांत झालेली अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीच्या दुसऱ्या हप्त्यात २ हजार १९२ कोटी ८९ लाख ५ हजार रुपये वितरित करण्यात आले, अशी माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली. जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते.

पहिल्या टप्प्यातील मदत २ हजार २९७ कोटी ६ लाख रुपये नोव्हेंबर २०२० मध्ये वितरित करण्यात आले होते. अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी १० हजार रुपये हेक्टरी व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार प्रतिहेक्टर या दराने २ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आहेत. याबाबतचा निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER