इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आयटीआर भरण्यास ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिली असल्याचं आयकर विभागाने (Income Tax Department) जाहीर करण्यात आले आहे. देशात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवरआयकर विभागाने आयटीआर भरण्याच्या तारखेत मुदतवाढ केली असून करदात्यांना दिलासा दिला आहे.

आयकर विभागाने म्हटले आहे की, कोरोना संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीच्या कालावधीत मुदतवाढ केली आहे. आता आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० करण्याचा निर्णय घेतला आहे. आयकर विभागाने आज ट्वीट करुन या संदर्भातमाहिती दिली आहे. याआधी सरकारने मे महिन्यात वित्त वर्ष २०१९-२० साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढवली होती. या तारखेत ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढ करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा रिटून भरण्याची तारीख वाढवली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे करदात्यांना फायदा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER