जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी वाढवण्यात आला एक तास वेळ

जीवनावश्यक वस्तू

औरंगाबाद : लॉकडाऊन वाढावल्यानंतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सकाळी 7 ते दुपारी 1 असा कालावधी ठरवण्यात आला होता. या कालावधीत आता आणखी एका तासाची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असा हा कालावधी करण्यात आला आहे.

किराणा दुकाने, हातगाड्या सकाळी सात ते दुपारी दोन वाजे पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी मंगळवारी (ता. २६) घेतला आहे. हे आदेश ३१ मेपर्यंत लागू राहणार आहेत. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे १४ ते २० मे दरम्यान लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता.

सहा दिवस जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यानंतर आस्तिककुमार पांडेय यांनी आदेश काढून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी सकाळी सात ते दुपारी एक वाजेचा वेळ दिला. त्यानंतर पांडेय यांनी मंगळवारी नवे आदेश काढले. त्यात म्हटले आहे, लॉकडाऊनच्या काळात महापालिकेच्या कार्यक्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांचा कालावधी वाढवणे नागरिकांच्या हितासाठी आवश्यक आहे. त्यामुळे अन्नधान्य, किराणा व भाजीपाला या संबंधाची दुकाने, हातगाड्या सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहतील.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER