निवडणुका होईपर्यंत मुदत संपलेल्या 22 हजार संस्था संचालकांना मुदतवाढ शक्य

मुंबई : शेतकरी कर्जमाफी आणि त्यानंतर कोरोना संसर्गाच्या (Corona Virus) धोका यामुळे आतापर्यंत तीन वेळा राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. कोरोना संसर्गाचा धोका कायम असल्याने दर तीन महिन्यांनी शासन आदेश काढण्यापेक्षा निवडणुका (Elections) होईपर्यंत संबंधित सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाला मुदत वाढ देण्याबाबत शासन विचार करत आहे. याबाबचा अध्यादेश लवकरच निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील २२ हजार सहकारी संस्था संचालकांना मुदतवाढीचा बोनस मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७३ (क-क) नुसार राज्य शासनाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलली. त्यानंतर नियमाच्या आधारे संचालक मंडळाला मुदतवाढ दिली आहे. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार आपत्तकाली परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलण्यास राज्य सरकारला अधिकार आहेत.

त्यानुसार कमीत कमी सहा महिने तर जास्तीत जास्त एक वर्ष निवडणुका पुढे ढकलता येतात. राज्यातील अ, ब, क व ड प्रवर्गातील २२ हजार ६८० सहकारी संस्थांच्या निवडणुका १७ डिसेंबरपर्यंत पुढे गेल्या. पुन्हा तीन महिन्यांच्या मुदत वाढीचा शासन आदेश काढण्यापेक्षा निवडणुका होईपर्यंत या संस्थांच्या संचालकांना कायम ठेवण्याबाबत अध्यादेश निघण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER