एक्सप्रेस-वेवर शिवसैनिकांची दादागिरी, बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला केलं ओव्हरटेक

Truck Overtake

मुंबई :- एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. जलील यांनी एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओवरुन मोठी खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरील आहे. यामध्ये एक गाडी बंदुक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचे (Shivsena) वाघाचं चिन्ह आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला असून यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे केली आहे.

या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये गाडीचा क्रमांकही स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या व्यक्तीचा शोध घ्या व अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकाराची दखल गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घेणार का?, असा सवालही त्यांनी केला आहे. जलील यांनी हा व्हिडीओ अनिल देशमुख आणि मुंख्यमंत्री कार्यालयाला टॅग केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यावर काय कारवाई करतात याकडे विरोधकांपासून सर्वांचेच लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER