सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; २ प्रसिद्ध अभिनेत्रींसह ५ जणांना अटक

Sex Racket - 5 Arrested Including 2 Famous Actresses

मुंबई :- ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरात फ्लॅटमध्ये चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश झाला आहे. याठिकाणी ठाणे गुन्हे शाखेच्या (Thane Crime Branch) युनिट-१च्या पथकाने बुधवारी धाडी मारली. पोलिसांनी या कारवाईत दोन बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्रींसह, एक पुरुष दलाल, दोन महिला एजंट आणि सेक्स रॅकेट चालवण्यासाठी फ्लॅट देणारा मालक अशा ५ जणांना अटक केली आहे. एका खाजगी सोसायटीतील हे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच या सेक्स रॅकेटची लिंक मुंबईतील अनेक बड्या अभिनेत्रींशी असल्याचे बोलले जात आहे.

ठाणे गुन्हे शाखा युनिट-१च्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही अभिनेत्रींनी तामिळ सिनेमात लीड रोल केला असून त्यांनी बॉलिवूडच्या काही सिनेमात साईड रोल आणि सिरीयलमध्ये मुख्य रोल केल्याचे आढळले आहे. सध्या कोरोनामुळे यांची आर्थिक चणचण दूर करण्यासाठी त्या लाखो रुपये घेत होत्या. या कलाकारांना वेश्या व्यवसायाची नामुष्की पत्करावी लागल्याचे चित्र या घटनेने समोर आले आहे.

या दोन्ही अभिनेत्री दलालाच्या माध्यमातून १ लाख ८० हजारात सौदा करून ठाण्याच्या पाचपाखाडी नटराज सोसायटीतील प्लॅटमध्ये आल्या होत्या. याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकणे यांनी छापेमारी करून हे रॅकेट उध्वस्त केले आहे.

पोलिसांनी दोन अभिनेत्री, दोन महिला एजंट आणि एका पुरुष एजंटचे मोबाईल जप्त केल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये अनेक अभिनेत्री, मॉडेल, ब्युटीक्वीन यांचे फोटो सापडले आहेत. यावरून असे आढळून आले की, या कारवाईची लिंक ही फक्त ठाणे, मुंबई पुरतीच मर्यादित नसून इतर राज्यातदेखील असल्याचे बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button