अँटालियाजवळ स्फोटके : ‘त्या’ स्कॉर्पिओ, इनोव्हाचे ड्रायव्हर सापडले; दोघांचेही वाझेंशी कनेक्शन?

Mukesh Ambani - Scorpio - Sachin Vaze

मुंबई : उद्योगपती अंबानी यांच्या ‘अँटालिया’ घरासमोर सापडेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा कारच्या ड्रायव्हरची माहिती मिळाली आहे. ते दोघेही पोलीस दलाचे कर्मचारी असून वाझेंच्या संपर्कात आहेत, अशी धक्कादायक माहिती आहे, असे सूत्रांनी सांगितले.

अँटालिया (Antilia) स्कॉर्पिओ स्फोटकेप्रकरण एनआयएने हाती घेतल्यानंतर चौकशीत बरीच माहिती मिळाल्याने सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केल्यापासून या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती उघड होते आहे. अँटालिया येथे स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणणाऱ्या ड्रायव्हरची माहिती मिळाली असून या स्कॉर्पिओसोबत एक इनोव्हाही अँटालियाबाहेर आली होती. २४ फेब्रुवारीच्या रात्री १ वाजता या दोन्ही कार आल्या होत्या. स्कॉर्पिओ पार्क केल्यानंतर ही इनोव्हा कार निघून गेली. धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही कारचे ड्रायव्हर पोलीस दलाचे कर्मचारी असून वाझेंच्या संपर्कातील आहेत व ते वाझेंच्या सीआययू युनिटशी संबंधित आहेत. यामुळे वाझे यांना नेमके काय करायचे होते? अँटालिया येथे स्फोटकांनी भरलेली कार कुणी? का? कशासाठी? आणि कुणाच्या सांगण्यावरून आणली? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

त्यांच्यावर नजर
या दोन्ही ड्रायव्हरवर एनआयएचे अधिकारी नजर ठेवून आहेत. ते पळून जाऊ नयेत म्हणून एनआयएचे अधिकारी सतर्क आहेत व त्या दोघांनाही लवकरच चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER