शिवसेनेची उर्मिला मातोंडकर यांनाच का पसंती?; ‘हे’ आहे कारण

Thackeray-matondkar

मुंबई :- ज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार या चार क्षेत्रांशी संबंधित १२ मान्यवरांची महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. यापार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उर्मिला यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली आणि त्यानंतर उर्मिला यांनीही शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्यास होकार दर्शवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून शिवसेनेने नेमकी उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांच्या नावाला का पसंती दिली, यावर उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत .

खरंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी उर्मिला यांना विधान परिषद सदस्यत्वासाठी विचारणा केली होती मात्र त्यास त्यांनी नम्रपणे नकार दिला. हे कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांना फोन केला. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून तुम्ही शिवसेनेच्या वतीने परिषदेवर जावे, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शित केली आणि त्याला उर्मिला यांनी होकारही दिला, असे सांगण्यात आले. यावर आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसचीही कोणतीच हरकत नाही. आता शिवसेनेने हा निर्णय अचानक का घेतला, हा कळीचा प्रश्न असून त्याला तशीच पार्श्वभूमीही आहे.

दरम्यान काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर उर्मिला राजकीय वर्तुळात फारशा चर्चेत नव्हत्या. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध शिवसेना संघर्ष भडकला आणि त्यातूनच उर्मिला प्रकाशझोतात आल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER