“एक तरी ओवी अनुभवावी !”(भाग-2)

Modern

हाय फ्रेंड्स ! काल अापण बोलल्याप्रमाणे, स्वतःची प्रगती करून ध्येय गाठणे हे जितके महत्त्वाचे तितकीच त्यादिशेने आपली होणारी वाटचालही जास्त महत्वाची असते. कारण ही प्रगती एकेका दिवसाच्या हिशोबाने होत असते आणि आपल्यातील बदलाचा हा प्रत्येक क्षण आपल्याला जाणवत असतो, हा बदल आपल्याला सुखावणारा ही असतो.

आपण गेल्या दोन महिन्यात सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी कोणकोणत्या आयामातून प्रयत्न केले आणि बोलत होतो, याचा आढावा घ्यायचे ठरवले होते. त्यापैकी व्यक्तिमत्व विकसनाच्या दृष्टीने काही लेख वाचले आणि चर्चा केली. त्यापैकी तुम्ही कुठला अध्याय अनुभवायला घेतला आहे याची मला उत्सुकता आहेच!

आजच्या लेखामध्ये आपण विविध विषय ,जसे की काही विशिष्ट सणसमारंभ किंवा एखादी परिस्थिती जसे की कोरोना काळ, आणि त्याचा परिणाम. याशिवाय आपले काही स्वभावविशेष त्याचे जीवनावर होणारे परिणाम .काही सामाजिक घडामोडी ज्याचा समाज मनावर खूप मोठा परिणाम होऊन समाजमन ढवळून उठ्ते .यावरही आपण विचार करणार आहोत ! जीवनाच्या विविध टप्प्यांवरती होणारे बदल ,त्याचे व्यक्तिगत व सामाजिक परिणाम असे जे विषय हाताळले त्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न आहे .त्यामुळे ते लेख जर तुम्ही वाचले नसतील, तर ते वाचू शकाल कीवा ज्या गोष्टींची आवश्यकता तुम्हाला वाटते अशा विषयांवर जास्त काळजीपूर्वक पुनर्वाचन कराल.

“संघटनेची देवता श्री गणेश”या लेखातून टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. त्यामागची कारण परंपरा लक्षात घेऊन आज आपण ज्या संकटांशी लढणे गरजेचे आहे त्यासाठी श्री गणेश ही देवता संघटनेची देवता आहे हे लक्षात घेऊन त्या संघटन शक्तीचा उपयोग आज कोरोनाशी लढताना आपण करू शकतो. त्याचप्रमाणे “ज्योतीने तेजाची आरती “या दिव्याच्या अमावस्येला अनुसरून लिहिलेल्या लेखातून समाजासाठी,वैयक्तिक रित्या उत्तम काम करणाऱ्या व्यक्ती जणू त्या स्वतंत्र छोट्या ज्योतिच आहेत .अशा अर्थाने त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ज्योतीने ज्योत पेटवावी आणि आपण सगळ्यांनीच समाजसेवेचा काही भार उचलून पूर्ण परिसर तेजोमय करून टाकावा. अशी संकल्पना त्या लेखात होती.

“Covid-19 च्या दरम्यान वाढलेली कुमारवयीन मुलानंमधील चिंता”या लेखात या आजारामुळे समाजजीवन ढवळून निघाले आहे .पण कुमारवयीन मुलांना तर ,एकतर 24 तास पालकांच्या समोर बसायची वेळ आलेली आहे, ते त्यांना इरिटेटिंग होऊ शकते, या वयात बरोबरीच्या मित्र-मैत्रिणींचा सहवास हवासा वाटतो. त्यामुळे त्यांचे हे प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न झाला तर मुलांना खूप उपयोग होईल. याच” कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणाचा धुमाकूळ!”हा खरच चर्चेचा विषय आहे किती तथ्य आहे त्यात? काय फायदा त्याचा? मुले शाळेत जातात ते केवळ पुस्तकी अभ्यास शिक्षणासाठी नाही तर जीवनाचे इतर धडे गिरवण्याची संधी, शेअरिंग ची संधी समवयस्कामध्ये बागडणे या सगळ्या गोष्टींना ते कसे मुकतात आहे. याला पर्याय काय असू शकेल याची चर्चा या लेखात झाली असल्याकारणाने, या प्रश्नाकडे चार बाजूंनी बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला असे वाटते.

त्याचप्रमाणे लोकडाऊन मुळे “जीवनकौशल्य विकास किती महत्त्वाचा!” हे मोठ्या प्रौढ व्यक्तींना ही कळू लागले. मोठ्या ऑफिस मध्ये कॉम्प्युटर समोर बसून काम करणे आणि दररोज अनेक कामे हाताने करणे ,यात किती छोट्या छोट्या गोष्टीत स्किल आहे याची महती या लॉकडाउन काळाने कळवून दिली, “जीवन कौशल्याचे महत्त्व” या लेखातून याची मांडणी केली गेली.

त्याच प्रमाणे “पुरुषत्व हेच संकट ठरते का महामारीत?”अशा या अर्थ असलेल्या या लेखामध्ये लॉक डाऊन पिरेड मध्ये किती अत्याचार स्त्रीला भोगावे लागले? त्याचा जर ताळमेळ बघितला तर आणि पूर्वी पासूनच्या जसे की युद्ध भूकंप यासारख्या आव्हानात्मक परिस्थितीमध्येही अशी तुलना केली तर असता हे लक्षात येतं की कुठलेही संकट असो पहिल्यांदा बळी पडते ती स्त्री! आणि ती बळी त्या संकटाची नसते ,तर” पुरुषत्वाची” असते. कशी ते लेखातूनच वाचायला हवें . हा लेख अनेकांना खूप आवडल्याचे अभिप्राय आले.यातून योग्य निष्कर्ष काढून वाटचाल झाली तर ते लेखाचे यश असेल.

या व्यतिरिक्त अनेक सामाजिक विषयांवर चर्चा झाली त्यामागे उद्देश असा होता की सामाजिक प्रश्नांवर चर्चा पण त्याची मानसशास्त्रीय बाजू समजून घेऊन व्हायला हवी .त्यातूनच “आधी लगीन ph. d चे “हा विषय मांडला गेला. यातून मुलींची लग्नाची वय शिक्षण,करियर कडे जास्त फोकस केल्याने किंवा त्यातून वाढणाऱ्या अतिरिक्त अपेक्षा त्या कशा वाढतात आहे ??आणि मुख्य म्हणजे त्यातून पुढील आयुष्यात िर्माण होणारे प्रश्‍न किंवा चिंता समस्या या बाबींचा ,सर्व बाजूंच्या मनस्थितीतून आढावा घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हाही लेख अनेकांना खूप आवडलेला आहे. तसाच एक लेख म्हणजे “कशी या त्यजू पदाला !”या लेखातून ही नवी पिढी आणि मागची पिढी यांच्यामध्ये होरपळणारी मधली पिढी ,त्यांच्यातला ताण, येणारे प्रश्न, खूप तडजोड करूनही जर थोडे प्रश्न आले तर नवीन पिढीने थोडे समजून घ्यावे, ही करुन याचना हलवून सोडते !कारण ते एक वास्तव आहे! यातून तरुण पिढी थोडी समजून घेईल तर छानच!

“मॉल ची झगमगणारी दुनिया”हा त्यामानाने हलकाफुलका असणारा लेख! झगमगीत पणातील थोडासा रुक्षपणा आणि घराच्या जवळ असणाऱ्या दुकान वाल्यांशी वर्षांनूवर्षाचे जुळणारे ऋणानुबंध, यामुळे निर्माण होणारे आत्मीयतेचे नाते ! अश्या प्रकारचा !जीवनातील बेगडीपणा वर थोडे फटके मारणारा आहे.

“जाणीव एकटेपणाची “आणि” प्रौढत्वी निज शैशवास जपणे”यातून वयो वृद्धांच्या प्रश्नांकडे डोळसपणे आणि सकारात्मकतेने कसे बघता येईल याची चर्चा असल्याने त्या वयाच्या लोकांना योग्य विचारांची दिशा मिळू शकेल. “नांदा सौख्यभरे “सारख्या लेखातून पती-पत्नीमधील नाते नेमके कसे ?त्यात महत्त्व कशाला द्यायला हवे? जोडीदार निवडीचे योग्य पर्याय कोणते? या नात्यात आदर्श असे” टेलर मेड” नाते असूच शकत नाही !असे सांगून स्वप्नील ,आभासी जगातील तरुणांना “जमीपर पाव” ठेवायला सुचवले आहे.

“मातृत्व एक संवेदनशीलता !”या लेखातून मातृत्वाच्या अर्थाचा परिघ, कक्षा रुंद करून मांडला गेला आहे .अजूनही समाजात मातृत्व संबंधी जी सर्वमान्य संकल्पना आहे, मुलाला जन्म दिला की मातृत्व येतं, याला थोडा ‘बायपास ‘करून जगाची काळजी घेणारी संवेदनशील व्यक्ती, तिला “मातृत्व” अस आपण म्हणू शकतो .मग ती पुरुषही असेना का !म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली ठरले, विठोबा माऊली ठरले! लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार हा आजचा फार ज्वलंत प्रश्न ठरला आहे त्यासाठी झालेला पोक्सो कायदा यासंबंधीची माहिती आणि या समस्येत समाज, पालक व शिक्षकांनी ,कुठली भूमिका घ्यायला हवी ?यावर चर्चा झाल्याने आता भूमिकेबाबत सतर्क राहता येईल असे वाटते. आयुष्यातील बराचसा काळ गृहिणीपदासाठी दिल्यावर महत्त्वाकांक्षी स्त्री, वयाच्या एका अशा टप्प्यावर करियर सुरू करते की तिने कितीही मोठी झेप घेतली तरी ती तोकडी पडणारी असते .तिला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते ?आणि तरीही जो आत्मसन्मान तिच्यात जागा होतो त्याला तोड नसते. याचे वर्णन “एका तिची गोष्ट “मध्ये आहे .ही कथा प्रेरणादायी ठरावी. “मदतीची लक्ष्मणरेषा “यात मदत करण्याची चांगली सवयही कधीकधी कशी त्रासदायक होऊ शकते याचे विवेचन करते .म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच ,समतोल सर्वत्रच हवा! ही जाणीव देते.

फ्रेंड्स ! साधारण गोषवारा घेण्याचा हा प्रयत्न ! या शिवाय “सदभावनांचे बँक बॅलन्स,” “ओसरी एक फ्रेंड बेंच शिप”यासारखे अनेक महत्वाचे विषय हाताळले गेले. विस्तारभयास्तव ते देणे शक्य नाही. “Now ball is in your court !”पण तरीही “एक तरी ओवी अनुभवावी “इतुकेच मागणे !

-मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

ही बातमी पण वाचा : एक तरी ओवी अनुभवावी…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER