अधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

Vikas Thackeray-Uddhav Thackeray

नागपूर : नागपूरचे आमदार विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) एक पत्र लिहीले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नागपुरसह विदर्भाच्या आरोग्य यंत्रणेसंदर्भात महत्त्वाची मागणी केली आहे.

दरवर्षी विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. फक्त अधिवेशनासाठी उघडण्यात येणा-या विधानभवनासाठी अधिवेशनासाठी विशेष खर्च करावा लागत असतो. त्यातच यंदा देशासह राज्यात कोरोनाने हाहाःकार केला आहे. नागपुरात कोरोनाचे रग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. उत्तम मेडीकल सेवेसाठी प्रसिद्ध असणा-या नागपुरमध्येही आरोग्य यंत्रणा कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन रद्द करून त्या अधिवेशनावर जो खर्च होतो तो खर्च नागपूरसह विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा अशी मागणी केली आहे.

विकास ठाकरेंनी पत्रात सांगितले आहे की, ‘गेल्या वर्षी 6 दिवसांच्या अधिवेशनावर 13 कोटी खर्च झाला होता. तोच खर्च विदर्भातील मेडिकल यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी वापरावा. नागपूरमध्ये ऑगस्टपेक्षा सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात मृत्युच प्रमाण सुद्धा वाढत आहे. लोकांना बेड मिळत नाही अशी गंभीर स्थिती ठाकरे यांनी पत्रातून मांडली आहे.

तर दुसरीकडे महानगर पालिकेच्या दवाखान्यात डॉक्टर आणि इतर स्टाफ मिळत नाहीत. नागपुरातील खाजगी रुग्णालयात 80 टक्के बेड राखीव ठेवायला सांगितले आहे. इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही सगळी परिस्थिती सुधारण्यासाठी अधिवेशनावर होणारा खर्च टाळावा असे ठाकरे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER