नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून गुन्हा दाखल करा; राज्यपालांकडे भाजपची मागणी

Chandrakant Patil - Nawab Malik - Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई :- राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजप नेत्यांवर खोटे आरोप केले. जनतेची दिशाभूल केली असून त्यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे केली. आज भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत ही मागणी उचलून धरली.

राज्यपालांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शन (Remdesivir) उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रास पुरवठा करण्यास मनाई केली, असा खोटा आरोप मलिक यांनी ट्विटच्या माध्यमातून केला. केलेल्या आरोपाचा एकही पुरावा त्यांनी आतापर्यंत सादर केलेला नाही. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारच्या विरोधात खोटी माहिती देऊन लोकांच्या मनात असंतोष निर्माण केला, राज्याचा मंत्री असूनही केंद्राच्या विरोधात असंतोष निर्माण करून घटनात्मक चौकटीला नुकसान पोहचवले. कोरोनाच्या (Corona) महामारीत खोटी माहिती पसरवली तसेच जनतेत भीती निर्माण केली. त्यांच्या या अपराधाबद्दल राज्य सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी नवाब मलिक यांची सरकारमधून हकालपट्टी करावी तसेच त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करून कायद्याच्या कलमांनुसार योग्य ती शिक्षा द्यावी, अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : आघाडी सरकारचे शिल्पकार संजय राऊतांनी विधानसभा अधिवेशनाचा सल्ला द्यावा – चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button