आरोग्यमंत्र्यांची हकालपट्टी करा; किरीट सोमय्या यांची मागणी

rajesh Tope - Kirit Somiyaa - Maharashtra Today
rajesh Tope - Kirit Somiyaa - Maharashtra Today

मुंबई :- आज ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजनअभावी चार रुग्ण दगावले. या घटनेनंतर भाजपने पुन्हा ठाकरे सरकारवर संताप व्यक्त केला. रोज वेगवेगळ्या रुग्णालयांत कधी आगीमुळे तर कधी ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. मात्र आरोग्यमंत्री फक्त भाषण करत फिरतात. इतक्या घटना घडत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांची हकालपट्टी का करत नाही? असा सवाल भाजप खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

आज ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजनअभावी चार  जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासन आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु, या रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? ऑक्सिजनअभावी झाला की अन्य कारणांमुळे याबाबत अद्यापही रुग्णालय प्रशासनाने माहिती दिलेली नाही.

दगावलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांचा आरोप आहे की, “रुग्णालयातील ऑक्सिजन संपला होता. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने इतर ठिकाणाहून ऑक्सिजन मागवला. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने चार  रुग्ण क्रिटिकल होते, असे सांगितले. परंतु त्यांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाला. जर ऑक्सिजनअभावी त्यांचा मृत्यू झाला असता तर एकाच वेळी अनेक रुग्ण दगावले असते. त्या वॉर्डमध्ये एकूण ३५ रुग्ण होते, असे सांगण्यात आले.

यासंदर्भात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. यासाठी सहा  सदस्यीय समितीची स्थापना केली जाणार आहे. यामध्ये पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, सिव्हिल रुग्णालयाचे सर्जन अशा वेगवेगळ्या तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. जे या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत.” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : रुग्णांच्या नातेवाईकांना ‘रेमडेसिवीर’ आणण्याची सक्ती करू नका : राजेश टोपे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button