मुख्यमंत्र्यांकडून मंदिरे उघडी करण्याची अपेक्षा, अन्यथा स्वतःहून उघडावी लागेल – तुषार भोसले

Acharya-Tushar-Bhosale-on-uddhav-

मुंबई : राज्यात कोरोनाच्या (Corona) फैलावाला सुरुवात झाल्यानंतर राज्यातील जनतेशी सातत्याने संवाद साधणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, भाजपा (BJP) आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री मंदिरे उघडी करण्याची घोषणा करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

त्यांनी ट्विट करत म्हटले की, आशा करतो की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजच्या संबोधनातून भाविक जनतेची भावना लक्षात घेऊन आज तरी मंदिरे सुरू करण्यासंदर्भात घोषणा करतील.

तसे न झाल्यास, दि. १८ सप्टेंबर रोजी अधिक मास प्रारंभ होत असल्याने या दिवशी नाइलाजाने आम्हाला स्वतःहून मंदिरे उघडावी लागतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER