येडीयुराप्पांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; 17 मंत्र्यांनी घेतली शपथ

Yeddyurappa

येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महिन्याभराच्या कालावधीनंतर अखेर आज मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला आहे. रविवारी त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि राज्यपाल विजुभाई वाला यांच्याकडे 17 मंत्र्यांच्या नावाची यादी सोपविली.


बेंगळुरु : कर्नाटकमध्ये भाजपनं सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महिनाभर तेथे राजकीय नाट्य चालले. अनेक घडामोडीनंतर अखेर भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. येडीयुरप्पा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज तब्बल एक महिन्यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. आज येडीयुरप्पांच्या 17 मंत्र्यांनी शपथ घेतली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला अधिक जागा मिळाल्यानंतर येडीयुराप्पा यांनी स्वत:ला मुख्यमंत्री घोषित केले होते. मात्र, ते बहुमत सिद्ध करू शकले नव्हते. कॉंग्रेस, जेडीएसनं कुमारस्वामिंना पाठींबा दिला आणि कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले होते. परंतू सत्ता स्थापनेचा वाद सुरूच होता. या वादात कुमारस्वामींनी दीड वर्ष रडतखडत सरकार चालविले होते. परंतू नाराज आमदारांनी बंड पुकारून त्यांनी भाजपच्या कमळाशी दोस्ती केली होती. त्यानंतर या आमदारांनी मुंबई गाठली होती. तेथे महानाट्याला अजूनच रंगत चढली होती. अखेर मुख्यमंत्री कुमारस्वामींनी चालढकल करत विधानसभेत विश्वास प्रस्ताव मांडला होता. यावेळही वेळकाढू धोरण अवलंबत एक आठवडा टोलवाटोलवी केली होती. अखेर बहुमत सिद्ध होत नसल्याचे पाहून कुमारस्वामींनी राजीनामा दिला होता.

दरम्यान येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महिन्याभराच्या कालावधीनंतर अखेर आज मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला आहे. रविवारी त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि राज्यपाल विजुभाई वाला यांच्याकडे 17 मंत्र्यांच्या नावाची यादी सोपविली. यामध्ये भाजपाचे काही जुने नेते, येडीयुराप्पांच्या आधीच्या सरकारमध्ये असलेले काही नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे.