वीज बिल माफ करा : कोल्हापुरात भव्य वाहन रॅली

Excuse the electricity bill: Massive vehicle rally in Kolhapur

कोल्हापूर :- लॉकडाऊन काळातील वीज बिल (Electricity Bill) माफ करा, या मागणीसाठी कोल्हापुरात आज भव्य वाहन रॅली काढण्यात आली. यात ३०० हून अधिक रिक्षा, २५० हून  अधिक ट्रक आणि तितक्याच ट्रॅव्हल्ससुद्धा सहभागी झाल्या. कोल्हापूरमध्ये आजपर्यंत निघालेल्या वाहन रॅलीत (Massive vehicle Rally) ही सर्वाधिक भव्य रॅली असल्याचे सांगण्यात येत आहे.

शासनाने वीज बिल माफी संदर्भात निर्णय घ्यावा; अन्यथा राज्यभरात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला. ‘आम्ही वीज बिल भरणार नाही कृती समिती’च्यावतीने हा भव्य मोर्चा काढण्यात आला. गांधी मैदानापासून या मोर्च्याला  सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील विविध भागांतून वाहन रॅली निघाली.

ही बातमी पण वाचा : गुंठेवारी निर्णय : कोल्हापुरात अडीच लाख नागरिकांना लाभ

वाढीव वीज बिलाचा मुद्दा जेव्हा समोर आला, त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने पार पडली. याची दखल घेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिवाळीला गोड बातमी देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, आपल्या वक्तव्यावर घूमजाव करत आलेले वीज बिल भरावेच लागेल, असे त्यांनी म्हटले. मात्र, महाराष्ट्रातील जनता खुळी नाही. शासनाने आजच्या या आंदोलनाची दखल घेऊन शहाणपणाने घेण्याची गरज आहे. अन्यथा कोल्हापुरातील या जनतेचा आवाज राज्यभरात पोहचेल, असा इशारासुद्धा आंदोलकांनी दिला.

रॅलीमुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. एकाच वेळी शहरात इतक्या मोठ्या संख्येने ट्रक, टेम्पो, ट्रॅव्हल्स रस्त्यावर आल्याने पोलीस वाहतूक शाखेची नियोजन करताना तारांबळ उडाली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER