एक्साईचे लाचखोर निरीक्षकासह दोघे अखेर निलंबित

Police

नागपूर: बिअर बार च्या रेकॉर्ड तपासणी व चालान कारवाई टाळण्यासाठी प्रति महा चार हजार रूपये लाचेची मागणी केल्या प्रकरणी अटक झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकासह दोघांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.

संजय श्रीधर मिठारी वय ५१ वर्ष निरीक्षक व बालाजी उत्तम राठोड वय २७ वर्ष जवान (शिपाई)अशी निलंबित लाचखोरांची नावे आहेत.दोघेही राज्य उत्पादन शुल्क विभाग उमरेड येथे नेमणुकीस असून त्यांंचे कार्यालय हिंगणा रोड सिम टाकळी येथे आहे.

जवान बालाजी राठोड याने २९ जानेवारी रोजी हिंगणा रोड वानाडोंगरी येथील मयूर बिअरबार अँड रेस्टारंट येथे जाऊन ,मँनेजरला रजिस्टर बिल, बाँटल , बँच नंबरची मागणी करून रेकॉर्ड तपासायचा असल्याची भीती दाखविली आणि रेकॉर्ड न तपासणे व चालान कारवाई टाळण्यासाठी मला (राठोड)प्रति महा १ हजार रुपये व निरीक्षक संजय मिठारीस प्रति महा ३ हजार रूपये द्यावे लागेल असे सांगून नोव्हेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ अशा तीन महिन्याचे १२ हजार रुपये लाचेची मागणी केली.या प्रकरणी मँनेजरच्या तक्रारी वरुन लाच प्रतिबंध पथकाने गुन्हा दाखल करुन ,२ फेब्रुवारी रोजी टाकळी सिम येथील कार्यालयात सापळा रचून ,१२ हजाराची लाच घेतांना बालाजी राठोडला रंगेहात पकडण्यात आले नंतर संजय मिठारीलाही अटक करण्यात आली.ही कारवाई अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुधलवार यांचे मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक कदम व त्यांंच्या पथकाने केली होती.

निरीक्षक संजय मिठारी व जवान बालाजी राठोड याच्या या क्रुत्याची दखल घेत , राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त जोशी यांनी या दोघांनाही शिस्तभंग केल्या प्रकरणी ११ फेब्रुवारी रोजी निलंबित केले आहे.

विनायक पुंड