मर्यादेपेक्षा जास्त सोने सापडले; कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर रोखले

krunal Pandya

मुंबई : ‘मुंबई इंडियन्स’चा खेळाडू कृणाल पांड्याला (Krunal Pandya) मुंबई विमानतळावर रोखले. कृणाल आयपीएल खेळून दुबईवरून परत आला तेव्हा त्याच्याजवळ मर्यादेपेक्षा जास्त सोने आणि इतर मौल्यवान वस्तू आढळल्या. कस्टम विभाग त्याची चौकशी करतो आहे. कोरोनामुळे या वेळच्या आयपीएल स्पर्धा दुबईत घेण्यात आल्या. मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा चॅम्पिअन ठरली आहे.

मुंबई इंडियन्स संघ गुरुवारी दुबईहून भारतात परतला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांना कृणाल पांड्याकडे प्रमाणापेक्षा जास्त सोने आणि इतर मौल्यवान वस्तू असल्याचा संशय असल्याने चौकशी सुरू आहे. एक वर्षाहून अधिक काळ परदेशात राहणारी व्यक्ती ५० हजारांपर्यंतच सोने भारतात आणू शकते.

यावर शुल्क आकारला जात नाही. महिलांसाठी ही सूट एक लाखापर्यंत आहे. ही सूट फक्त सोन्याच्या दागिन्यांवर आहे. सोन्याचे कॉइन किंवा बिस्किट्स यासाठी शुल्क भरावे लागते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER