९१ वर्षीय माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोनामुक्त

Shivajirao Patil Nilangekar

लातूर : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar ) यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोनावर मात केली असून त्यांचा कोरोनाचा (Corona) अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना १६ जुलैला कोरोनाची लागण झाल्याचं पुढं आलं होत. त्यांना काही लक्षणं जाणवत होती. त्यावेळी त्यांनी तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर १७ दिवसांनी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. डॉ. निलंगेकर यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याच्या या गोड बातमीने जिल्हा व जिल्ह्या बाहेरुन मोठा आनंद व्यक्त होत आहे.

देवाचा आशीर्वाद व जनतेच्या शुभेच्छांच्या बळावर दादासाहेबांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची प्रकृती आता चांगली असून त्यामध्ये सुधारणा होत असल्याचे त्यांचे सुपूत्र तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER