फडणवीसांचे विश्वासू आमदार अजित पवारांच्या भेटीला; चर्चेला उधाण

Ajit Pawar-fadnavis

मुंबई : भाजपचे बडे नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. प्रसाद लाड हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्याने या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रसाद लाड यांच्या भेटीवर अजित पवार यांनी खुलासा करत ही भेट सामान्य असल्याचे म्हटले आहे. काही सार्वजनिक कामानिमित्त लाड हे भेटायला आले होते. यात काहीही वेगळं नाही.

अशा भेटी होत असतात, असंही अजित पवारांनी सांगितलं. पुण्यातल्या सर्किट हाऊसवर ही भेट झाली. दरम्यान महाराष्ट्रात सत्तास्थापनेची चर्चा सुरू असताना अजित पवारांनी बंड करत देवेंद्र फडणवीसांसोबत जात सत्ता स्थापन केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यामुळे अशा भेटी घडल्या की, चर्चेला नव्याने सुरुवात होते आणि अंदाजही बांधले जातात.

फडणवीसांच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पवारांकडून ब्रेक

दरम्यान महाराष्ट्रात सत्तास्थापनेची चर्चा सुरू असताना अजित पवारांनी बंड करत देवेंद्र फडणवीसांसोबत जात सत्ता स्थापन केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यामुळे अशा भेटी घडल्या की चर्चेला नव्याने सुरुवात होते आणि अंदाजही बांधले जातात.