ईड्ब्ल्यूएसचा मराठा आरक्षणावर परिणाम होणार नाही – अनिल परब

मुंबई :- ईड्ब्ल्यूएस (EWS) आरक्षणाचा मराठा आरक्षणावर काहीही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. (Anil Parab statement on ews reservation for maratha community)

ईड्ब्ल्यूएस आरक्षणाला माझा विरोध नाही, पण याचा धोका SEBC ला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला केला होता. त्यावर परबांची प्रतिक्रिया आली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणालेत, मराठा संघटनात वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत. या संघटनांनी एकत्र येवून निर्णय द्यायला हवा. EWS च्या मागणीसाठी काही विद्यार्थी कोर्टात जातात व त्यांना ते द्यावं लागते. हा काही एका जातीपुरता निर्णय नाही, गरीब घटकांसाठीचा निर्णय आहे. याचा मराठा आरक्षणावर फरक पड़त नाही.

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकार हतबल, EWS मधून मराठ्यांना आरक्षण नको ; शरद पवारांनी स्वतः लक्ष घालावं – संभाजी राजे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER