विधानसभा निवडणुकीला विरोध नाही, ईव्हीएमविरोधच ‘मनसे’च्या रडारवर

Raj Thackeray

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ईव्हीएमविरोधी जन आंदोलन उभं करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे तीन महिन्यांवर  आलेली विधानसभा निवडणूक नव्हे तर ईव्हीएमविरोधी आंदोलनच मनसेच्या रडावर दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार बहुमताचा आकडा गाठत पुन्हा सत्तेत आले . मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विरोध केला. तसेच पुरावे सादर करत भाजपला धारेवर धरले; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मात्र नंतर , भाजपचा विजय हा ईव्हीएममुळेच झाल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधी नारा बुलंद केला. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या भेटीगाठीदेखील घेतल्या.

त्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा समावेश आहे . यामुळे राज  यांच्या या लढ्याला विरोधी पक्षांचादेखील पाठिंबा मिळत आहे. तसेच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ईव्हीएमविरोधी चळवळ उभी करण्याच्या सूचना केल्या.