भाजप उमेदवाराच्या कारमध्ये EVM मशीन; चार अधिकारी ‘निलंबित’

BJP - EVM - Maharastra Today

नवी दिल्ली :- आसाममधील रताबारी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील EVM मशीन भाजप उमेदवाराच्या कारमध्ये सापडली. या मतदान केंद्रात फेरमतदानाचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. या प्रकरणात मतदान केंद्रप्रमुखांसह अन्य तीन  जणांना निलंबित केले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

इंदिरा एम. व्ही शाळेच्या मतदान केंद्र १४९ मधील EVM मशीन नेणारी कार करीमगंज जिल्ह्यातील नागरिकांनी अडवली. याबाबतचा व्हिडीओ समाज माध्यमांतून व्हायरल झाल्यानंतर निवडणूक समितीने आसामच्या मुख्य निवडणूक अधिकारी आणि आयोगाच्या विशेष निरीक्षकांकडून अहवाल मागवला. त्यानुसार EVM मशीन घेऊन जाणारी गाडी वाटेत बंद पडली.

करीमगंज जिल्ह्यातील कनाईशील येथे सुमारे ५० जणांच्या जमावाने ही गाडी अडवली. त्यानंतर मतदान केंद्र अधिकाऱ्यांना त्यांची चूक लक्षात आली. नंतर त्यांनी वाहन पुढे जाण्यास परवानगी नाकारली. त्यांना कारण विचारले असता सांगितले की, शेजारच्या मतदारसंघातील उमेदवार कृष्णेंद्रु पॉल यांची ती गाडी आहे. हे EVM मशीनमध्ये गडबड करण्यासाठी घेऊन जात आहे. हा आरोप राज्य निवडणूक आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आला  आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी आणि करीमगंजचे जिल्हा पोलीस अधीक्षक घटनास्थळावर येईपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांना वेठीस धरले होते. त्या कारमधील चारपैकी एक जण बेपत्ता झाला. त्यानंतर तो जवळच्या परिसरात सकाळी सापडला. तपासणी केल्यानंतर या EVM मशीनचे बीयू, सीयू आणि व्हीव्हीपॅटला कोणतीही हानी न होता ते सीलबंद असल्याचे आढळले. ते सर्व स्ट्रॉंग रूममध्ये जमा केले. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने या चारही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button