आमच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधातील पुरावे पक्षाकडे सुपूर्द : एकनाथ खडसे

Eknath Khadse

मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज असून वेळोवेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीत आमच्याविरोधात काम करणाऱ्या भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांविरोधातील पुरावे आपण पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केले असल्याचे भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. तसेच अशा कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले .

निवडणुकीत आमच्या काही महत्वाच्या कार्यकर्त्यांनी आमच्याविरोधात काम केलं. ही बाब सिद्ध करणाऱ्या संभाषणाच्या काही ऑडिओ क्लीप आणि व्हिडिओ स्वरुपातील पुरावे मी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. तसेच त्यांच्याकडे अशा कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची विनंती खडसे यांनी केली आहे.

दरम्यान खडसे यांनी काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल अर्धा तास झालेल्या या चर्चेनंतर दिल्लीत कुठल्याही भाजप नेत्याची भेट न घेता ते सरळ मुंबईला निघाले असून ते आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे भेट घेणार असल्याची माहिती आहे.