सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार? चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

Chandrakant Patil CM uddhav-Thackeray.jpg

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधताना राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका केली आहे. सर्व काही केंद्र सरकारवर ढकलणार असाल तर राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय करणार? असा सवाल पाटील यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लस अशा प्रत्येक बाबतीत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार, असा सवाल पाटील यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर महिन्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली होती, तर गेल्या पाच महिन्यातच असे ऑक्सिजन प्रकल्प उभे केले असते तर आज त्यासाठी धावाधाव करावी लागली नसती. त्यांनी केंद्राने ऑक्सिजनचा 500 मेट्रिक टनांचा अधिक पुरवठा मंजूर केल्यामुळे राज्याची गरज जेमतेम भागते हे कबूल केले ते बरे झाले. राज्याला पंतप्रधानांच्या सूचनेनुसार रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला असल्याचेही त्यांनी मान्य केले हे सुद्धा चांगले झाले, असा चिमटा त्यांन काढला आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री आहे म्हणून दिल्लीचे पातशहा महाराष्ट्राची कोंडी करतायेत ; शिवसेनेचे टीकास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button