हमाम में सब नंगे है, तुमचा हिशोब काढला तर त्रास होईल, संजय राऊतांचा विरोधकांना इशारा

Sanjay Raut

मुंबई : “काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्यावर दगड मारण्याचा प्रयत्न करु नये, एखादा दगड तुमच्या घरावर बसला तर तुमचाही महाल कोसळून पडेल. विरोधी पक्षाने हे भान ठेवले पाहिजे. संयम ठेवला पाहिजे. आपण सुद्धा कधीकाळी सत्तेवर होता. आपण सुद्धा राजकारणामध्ये आहात. हमाम में सब नंगे है, याचं भान सगळ्यांनी ठेवले पाहिजे. आम्ही नितीमत्ता सांभाळतो, संयम पाळतो, नितीमत्ता आम्हाला कुणी शिकवू नये. पण नितीमत्ता तुम्ही किती पाळता याचा हिशोब करायला कुणी खातं-वही घेऊन बसलं, तर त्रास होईल”, अशा इशारा शिवसेनेचे (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षाला धंनजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांच्या संदर्भात दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवरुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षावर संजय राऊत यांनी सडकून टीका केली. म्हणालेत, याप्रकरणी घाईघाईने कोणताही निर्णय घेतला जाऊ नये. सर्व अधिकार शरद पवार (Sharad Pawar) यांचे आहेत. पण, काही लोकांनी परस्पर ठरवले आहे की, तेच कायदा आहेत आणि तेच कोर्ट आहेत. कुणावरही आरोप करायचे, कुणाला शिक्षा ठोठावायची, कुणाला पदावरुन खाली उतरवायचं, हे ते परस्पर ठरवतात. अशा प्रवृत्तींना उत्तेजन मिळू नये, म्हणून अशा प्रकरणांची खोलात जाऊन चौकशी केली पाहिजे.

तक्रारदार व्यक्तीबाबतही अनेक तक्रारदार आहे. त्यामुळे तक्रारदार व्यक्तीबाबतचे प्रकरणही गंभीर आणि धक्कादायक वाटायला लागलं आहे. ही एकच प्रवृत्ती नाही तर अशा अनेक प्रवृत्त्या आहेत ज्या कायद्याचा दुरुपयोग करत आहेत”, असे राऊत म्हणाले.

“हनिट्रॅप’ महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हता. पण अलीकडे ज्याप्रकारचे राजकारण गेल्या वर्षभरात चाललं आहे, चिकलफेक आणि बदनाम करण्याचं, त्यामध्ये वाढ झाली आहे. यात संबंधित व्यक्तीची फक्त बदनामी नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची बदनामी होते आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेऊ नये, या मताचा मी सुद्धा आहे. सकाळीच शरद पवारांना आम्ही भेटलो. सर्वांचीच ती भावना आहे. त्या भावनेचा आदर पवारांनी केला आहे, असे ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER