‘सबका साथ सबका विकास’ तरीही गावी पोहोचण्यासाठी दोरीवरची कसरत

Navasa Bhopal

भोपाळ :- एकीकडे भारत लवकरच चंद्रावर पोहोचण्यास स्वप्न पाहत आहे. अवघ्या काही वेळानंतर चांद्रयान-२ चन्द्राच्या दिशेने अवकाशात झेपावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून देशातील जनतेला मूर्ख बनवीत ‘सबका साथ सबका विकास’चा नारा दिला. मात्र मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील सोनकच तहसीलमधील नागरिकांना नदीच्या पुरातून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून चक्क दोरीच्या सहाय्याने नदी ओलांडून गाव गाठावे लागते. हे शोकांतिका आहे. मध्य प्रदेशात गत १५ वर्षांपासून भाजपची सत्ता होती हे उल्लेखनीय.

मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील सोनकच तहसीलमधील नागरिकांना नदीच्या पुरातून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील नागरिकांना चक्क सर्कशीतील कसरती किंवा डोंबाऱ्याच्या खेळाप्रमाणे जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. सर्कशीत किंवा डोंबाऱ्याच्या खेळात आपण नेहमीच पोटासाठी होणाऱ्या जीवघेण्या कसरती पाहतो. मात्र, इथं गावात पोहोचण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना डोंबारी बनाव लागत असल्याचं दिसतंय.

ही बातमी पण वाचा : तर भारतावर मराठ्यांचं राज्य असतं आणि येथे महान लोकशाही आली असती – शशी थरूर

भारताच्या सर्वात महत्वाकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेचं काऊंटडाऊन सुरू झाल आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरी कोटा येथील धवन स्पेस सेंटरमधून सोमवारी पहाटे २.५१ वाजता चांद्रयान-२ चे उड्डाण होणार आहे. चंद्राकडे झेपावणाऱ्या या अवकाश यानाचे देशभरातून कौतुक होत आहे. भारत एकीकडे चंद्रावर पाय ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, दुसरीकडे आजही गावांना जोडणारा रस्ता नसल्याचे दिसून येते. तर, पावसाळ्यात नद्यांना आलेल्या पुरांमध्ये एका गावचा दुसऱ्या गावाशी संपर्कही तुटतो. या परिस्थितीत गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील सोनकच तालुक्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील गावकऱ्यांना आपल्या गावात जाण्यासाठी चक्क दोरखंडावरुन जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे. दोरीवरून चालत जात नदी ओलांडावी लागते. पावसाच्या पाण्यामुळे दोन मार्गांमध्ये खंड पडला असून तेथे जाण्यास पुलही नाही. त्यामुळे गावकऱ्यांचा जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसत आहे. एकीकडे शेवटच्या गावापर्यंत वीज पोहोचविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, दुसरीकडे शेवटच्या गावापर्यंत आजही रस्ता पोहोचला नसल्याचे दिसून येते.

भाजपवर विश्वास टाकत दुसऱ्यांदा सत्तेत जनतेने बसविले. मग हा कोणता विकास असा सवालही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘चांद्रयान 2’ मोहिमेचे नेतृत्व करत आहे लखनऊची ‘रॉकेट वूमन रितू’