कोरोना लस मिळणार सर्वांना मोफत

COVID-19 Vaccine - Pratap Sarangi

भुवनेश्वर : कोरोनाला (Corona) रोखण्यासाठी लस बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच देशभरात ही लस मोफत देणार, नाममात्र किमतीत देणार, अशी वेगवेगळी वक्तव्ये केली जाऊ लागली आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस मोफत दिली जाईल, असे केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन राज्यमंत्री प्रताप सारंगी यांनी सांगितले.

बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. भाजपने (BJP) निवडणूक जाहीरनाम्यात राज्यातील जनतेला मोफत कोरोनाची लस देण्याचे आश्वासन दिले आहे. प्रचारसभांमधूनही अनेक नेत्यांनी त्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून त्यावर टीकेची झोड उठली. केवळ बिहारमध्येच का? असा सवाल त्यांनी केला आहे. मतदारांना आमिष दाखविण्याचाच हा प्रकार आहे. मोफत लस द्यायची असेल तर ती सर्वांनाच द्या, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रताप सारंगी यांनी देशातील सर्वच नागरिकांना मोफत लस दिली जाणार असल्याचे विधान केले. या लक्ष्मीसाठी प्रत्येक व्यक्तीमागे पाचशे रुपये खर्च येणार आहे मात्र नागरिकांना हीलस मोफत दिली जाणार असल्याचे सारंगी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER