इथे सगळेच समान भ्रष्टाचारी – शशांक केतकर

Shashank Ketkar

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेनेमधील (Shiv Sena) संघर्षात मुंबई (Mumbai) मनपाने तिचे कार्यालय अनधिकृत म्हणून पाडले. यावर मोठा वाद सुरू आहे. प्रकरण न्यायालयात आहे. यावर संताप व्यक्त करताना अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) याने अनेक प्रश्न विचारत म्हटले आहे – इथे सगळेच समान भ्रष्टाचारी आहेत.

याबाबत फेसबुकवर त्याने लिहिले – ‘कंगना राणावतचे ऑफिस अनधिकृत? असेलही.. पण मग ते पूर्ण होईपर्यंत का थांबले होते सगळे? आधी परवानग्या कोणी दिल्या? माझा कुठल्याही एका पक्षावर आरोप नाही किंवा कोणालाच पाठिंबा नाही कारण, इथे सगळेच समान भ्रष्टाचारी आहेत.’

ही फेसबुक पोस्ट लिहिण्यामागचा उद्देश त्याने सांगितला. २०१३ मध्ये त्याने मिरा रोडला एक फ्लॅट विकत घेतला आणि आता २०२० मध्येही तो अपूर्णच आहे. ‘माझी सगळी कागदपत्रे ‘क्लिअर’ आहेत, तरीही फक्त बोगस बिल्डरमुळे आणि राजकीय वादामुळे आम्ही सगळे फ्लॅटचे मालक हातावर हात धरून गेली सात वर्षे बसून आहोत. आमच्यामागे खरंच कुठलाच राजकीय पाठिंबा नाहीये, मग आमचे काय आणि फक्त हेच नाही तर जगण्यासाठी रोज ‘स्ट्रगल’ करावा लागतो त्या फसवणुकीचे काय?’ असा सवाल त्याने उपस्थित केला.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युप्रकरणामुळे सुरू झालेलं राजकारण पाहता माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या समस्या कधीच सोडवल्या जाणार नाहीत असे दिसते, असे त्याने पोस्टच्या अखेरीस म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER