प्रत्येक परिवाराची एक कहाणी असते शिवसेनावाल्याच्याही अनेक आहेत – संजय निरूपम

Sanjay Raut & Sanjay Nirupam

मुंबई :- बॉलिवूड अभिनेता संशांतसिंह (Shushant Singh Rajput) प्रकरणाला आता राजकीय रंग प्राप्त झाले आहे. सुशांतच्या प्रकरणात रोज नवीन गोष्टी पूढे येत आहेत. त्यातच शिवसेनेचे (Shivsena) नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे नाव या प्रकरणात आल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे.

वडीलांनी दोन लग्न केले म्हणून सुशांत नाराज होता असा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक या सदरामधून केला होता. यावरून कॉंग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी ट्विटरवरून जोरदार टीका केलेली आहे. प्रत्येक परिवाराची एखादी बाब असते व शिवसेना वाल्याच्याही अनेक आहेत असा टोला संजय निरूपम यांनी शिवसेनेला लगावला आहे.

ट्विटमध्ये संजय निरूपम म्हणतात, शिवसेनेचे कासदार सुशांतसिंग राजपुतच्या परिवाराबाबत खुजी भाषा वापरत आहेत. प्रत्यक परिवाराची एक कहानी असते शिवसेनावाल्याच्याही अनेक आहेत. सुशांतसिंहचा मृत्यू एक संवेदनशिल विषय आहे. शिवसेनेनं संवेदनशिलता दाखवावी ना की खुजेपणा असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी तीन पक्षाचे सरकार आहे. पक्ष शिवसनेसोबत सत्तेत असला तरी कॉंग्रेसचे नेते संजय निरूपम शिवसेनेवर वार करण्याची एकही संधी सोडत नाहीत असे दिसते. संजय निरूपम हे पूर्वी शिवसेनेत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER